बीपीएसएसच्या विभागीय अध्यक्षपदी प्रवीण खानझोडे

शोषित पीडितांच्या प्रश्नावर लढणार - खानझोडे

0

जब्बार चीनी, वणी: भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेच्या वणी विभागीय अध्यक्षपदी (वणी मारेगाव झरी) सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी ही निवड केली आहे.

बीपीएसएस हे एक देशव्यापी संघटन असून देशातील शोषित, पीडित, ओबीसी व्यक्तींच्या न्याय व हक्कासाठी ही संघटना देशभरात कार्य करीत आहे. तसेच ओबीसींची जातीनिहाय जनगनणा. ओबीसींना मिळणारे प्रतिनिधित्व हे मुद्दे या संघटनेच्या अग्रक्रमी आहे. तर प्रवीण खानझोडे हे परिसरातील एक सुपरिचित समाज सेवक असून एससी एसटी व ओबीसींच्या विविध प्रश्नांवर गेल्या अऩेक वर्षांपासून कार्यरत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

परिसरातील ओबीसी तसेच शोषित, पीडित समाजाचा आवाज दाबला जातो. त्यांना न्याय आणि हक्कासाठी आजही झगडावे लागते. आजच्या ओबीसी समाजात जनजागृती करण्याची नितांत गरज आहे. ओबीसींना असलेले हक्काची जाणीव आजही या समाजाला नाही त्यामुळे त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे. शहरापासून ते गावातील शेवटच्या टोकावरचा कोणताही व्यक्ती शोषित राहू नये यासाठी कार्य करणार, अशी प्रतिक्रिया प्रवीण खानझोडे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.