प्रवीण खानझोडे यांचा शिवसेनेत प्रवेश

संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यवतमाळ येथे पक्षप्रवेश

जितेंद्र कोठारी, वणी: बसपाचे वणी विधानसभा क्षेत्रातील माजी विधानसभा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यवतमाळ येथील आढावा बैठकीत शिवसेना नेते संजय राठोड व संजय देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. प्रवीण खानझोडे हे ओबीसी व दलित चळवळीतील एक सुपरिचित नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून ते बसपा पक्षात होते.

मुळचे राजूर येथील असलेले व सध्या वणी येथे स्थायीक झालेले प्रवीण खानझोडे यांनी बसपामध्ये जिल्हा उपाध्यक्ष तसेच वणी विधानसभा अध्यक्षपद भूषवले आहे. विद्यार्थी दशेपासून ते सामाजिक चळवळीशी जुळलेले आहे. एससी, एसटी व ओबीसींच्या विविध प्रश्नांवर गेल्या अऩेक वर्षांपासून कार्यरत आहे. लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून काम करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणूनही त्यांची ओळख आहे.

प्रवीण खानझोडे यांनी आज 10 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे एससी, एसटी  दलित चळवळीशी जुळलेला एक ओबीसी चेहरा मिळाला आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला मोठी बळकटी मिळाली आहे. प्रवीण खानझोडे यांच्या पत्नी देखील राजकारणात आहे. त्या पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती होत्या.

बसपाचा एक कॅडर म्हणून प्रवीण खानझोडे यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

हे देखील वाचा:

दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…

Comments are closed.