भूमी अभिलेख विभागाला मनसेचा दणका

प्रशांत वारकरी यांना वणी भूअभिलेख उपअधीक्षक पदाचा प्रभार

जितेंद्र कोठारी, वणी: येथील भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराविरुद्ध मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर प्रभारी उपअधीक्षक संजय पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. पवार यांच्या जागी आता घाटंजी येथील उपअधीक्षक प्रशांत वसंतराव वारकरी यांना वणीचा प्रभार देण्यात आला आहे.

जमिनीचे फेरफार, वारसांची नोंद, शेतजमीन व निवासी जागाची मोजणी, आठ (अ) नक्कल व जमिनी संबंधित शेकडो प्रकरण या कार्यालयात प्रलंबित आहे. आवश्यक शुल्क भरुनही वेळेवर काम केले जात नाही. तात्काळ मोजणीचे शुल्क घेऊनही 6 महिने मोजणी केली जात नाही. कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना स्थानिक कर्मचारी उद्धट वागणूक दिली जाते अशी कायम या विभागाविरोधात तक्रार असते.

वणी येथील भूमिअभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षक नाही. भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारा विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी अनेकदा आंदोलनही केले. गुरुवार 11 ऑक्टोबर रोजी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख शिवदास गुंड हे वणी येथे आले होते. तेव्हा मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजु उंबरकर व मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक यांची भेट घेऊन वणी येथील भूमिअभिलेख कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करावी अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवू असा इशारा दिला होता.

यावर कार्यवाही झाली असून प्रभारी उपअधीक्षक संजय पवार यांचा प्रभार काढून कायमस्वरूपी उपअधीक्षकची नेमणूक करावी. कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावे. अशी मागणी राजू उंबरकर यांनी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांनी प्रभारी उपअधीक्षक संजय पवार कडून त्वरित प्रभार काढून घाटंजी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक प्रशांत वारकरी याना वणी कार्यालयाचे अतिरिक्त प्रभार दिला आहे.

जिल्हा अधीक्षक यांची भेट घेताना मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर अध्यक्ष शिवराज पेचे, धनंजय त्रंबके, प्रकाश पिंपळकर, संतोष कोणप्रतिवार, शुभम भोयर व मनसे कार्यकर्ता हजर होते.

हे देखील वाचा:

दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेनेत प्रवेश

Comments are closed.