प्रयास स्कूलने वाहिली विश्वरत्न बाबासाहेबांना महापरिनिर्वाणदिनी आदरांजली

0 573

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिनाला गुरुवारी आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव जितेंद्र काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था अध्यक्ष ताई काळे, मुख्याध्यापक शिवशंकर नांदे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षक कोवे यांनी भीमगीत सादर केले. सांची परेकर, प्राची परेकर, संयुक्ता सोनेकर, पूजा किनाके, श्रुतिका निखाडे, श्रुती घाटे, सृष्टी निब्रड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संचालन शिक्षक जुमनाके यांनी केले. आभार कल्याणी गाऊत्रे यांनी मानले.

Comments
Loading...