…. आणि तिच्या पतीने चक्क हॉस्पिटलमधून पळ काढला

डॉ महेंद्र लोढा आणि मारेगावचे युवकांनी केली नवमातेला मदत

0

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील एका महिलेने 26 ऑक्टोबर रोजी लोढा (सत्यसेवा) हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी डॉ लोढा यांनी महिलेचे सिझर केले. परंतु नव्याने जन्माला आलेल्या मुलीच्या वडलांनी बिल द्यावे लागणार म्हणून तिच्या पतीने चक्क हॉस्पिटलमधून पळ काढला. आपला मोबाईल बंद केला. अशा अडचणीत फसलेल्या व नुकत्याच आई झालेल्या मातेचा पुढे अडचणींचा मोठा डोंगर उभा राहिला. यावेळी तिला मारेगाव येथील युवकांनी वर्गणी काढून औषधीचे पैसे देऊन तिला तिच्या घरी पाठविले. यात डॉ लोढा यांनी अत्यंत अल्प फीज घेऊन मानवतेचा परिचय दिला.

ही माता ही मारेगाव तालुक्यातील सराटी येथील रहिवासी. घरी हलाखीची परिस्थिती पती मजुरी करणारा अशा परिस्थितीत तिला दिवस गेले. प्रसूतीच्या वेळी तिला गढवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या ठिकाणी तिचे सीझर झाले. तिने एका गोडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलचे बिल 28 हजार रुपये निघाले.

हे ऐकताच तिच्या पतीने तेथून पळ काढला व मोबाईल बंद केला. ती माता हॉस्पिटलमध्ये एकटीच होती. ही बाब तेथेच प्रसूती झालेल्या मारेगाव येथील एका परिवारास कळली. त्यांनी मारेगाव येथील कलाम चौकातील युवकांना ही परिस्थिती बोलून दाखविली. मारेगावचे पत्रकार उमर शरीफ यांनी पुढाकार घेत डॉ. लोढा यांच्याशी बोलून त्या मातेच्या घरची परिस्थिती बोलून दाखविली.

त्यांच्याकडून 5000 रुपये जो औषधींचा खर्च होता त्याची निम्मी रक्कम देण्याचे मान्य केले. मारेगाव येथील युवकांकडून वर्गणी जमा केली. शनिवार 31 ऑक्टोबर रोजी तिला तिच्या गावी परत पाठविले. या सर्व प्रकरणात फक्त औषधीचे निम्मे पैसे घेतले. 28 हजाराचे बिल माफ करीत अत्यंत कमी पैसे घेतले. मानवतेचा परिचय देत त्या मातेला घरी जाण्यासाठी निःशुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

जुबेर पटेल, अतिफ शेख, सक्लेन खान, शेख शहजाद, सोहेल शेख, अरबाज पटेल, उमर शरीफ, हुमेर शेख, इसराईल शेख, नूर खा पठाण, सोनू शेख, शेख शाकिर, हरिदास किनाके, अंकित मेहता या मारेगाव शहरातील युवकांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या या मदतीला डॉ. लोढा यांनी पूर्ण सहकार्य केले. डॉ. लोढा आणि मारेगावच्या युवकांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.