बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज परिसर नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत राहतो. वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथील एकाने याच भागात भारीच धाडस केलं. आरोपी (26) दीपक चौपाटीजवळील प्रेमनगर परिसरात हातात धारदार चाकू घेऊन दहशत पसरवीत होता. हा प्रकार नेमका काय आहे, हे लोकांना कळायला काही मार्गच नव्हता. त्याची अॅक्शनबाजी सुरूच होती. ही बाब पोलिसांना कळली. त्यांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतलं.
आरोपीकडून लाकडी मूठ असलेला लोखंडी चाकू पोलिसांनी जप्त केला. ज्याचे पाते धारदार, टोकदार व निमुळते होते. चाकूची संपूर्ण लांबी 13 से.मी. व लोखंडी पात्याची लांबी 9 से.मी होती. तसेच हिरो कंपनीची निळे, पांढरे पट्टे असलेली काळ्या रंगाची एच.एफ. डीलक्स क्रमांक एम.एस 34 बी.टी. 4699 गाडी असा एकुण अंदाजे 40,500 रूपयांचा मुदेमाल मिळाला.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी किंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उंबरकर यांच्या आदेशानुसार DB पथक येथील PSI गुल्हाने, वसीम, निरंजन, गजानन, मोनेश्वर यांनी पार पाडली. आरोपीवर शस्त्र अधिनीयम 4/25 गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Comments are closed.