इनर व्हिल क्लबच्या अध्यक्षपदी अनिता टोंगे तर सचिवपदी शीतल बोनगिरवार
प्रसाद रेस्टॉरन्टमध्ये रंगला सोहळा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: इनर व्हिल क्लब ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. दिनांक 1 सप्टेंबर रोजी वणीतील प्रसाद रेस्टॉरंटमध्ये लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या अध्यक्ष संगिता संजय खाडे व सामाजिक कार्यकर्त्या शामा तोटावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. माजी अध्यक्ष इंदू सिंग यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्ष अनिता टोंगे यांनी पदभार स्वीकारला. सचिव पदी शीतल बोनगिरवार, तर उपाध्यक्ष पदी छाया बुटले यांची नियुक्ती करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी श्रुती उपाध्ये, आयएसओ पदाचा तिर्थ कौर तर सीसी पदाचा वैशाली डोळस यांनी पदभार स्वीकारला. तर वंदना वरहाटे, कल्पना घाटे, लता पाटणकर, संध्या लोनारे, तन्वी देशपांडे, पूनम सिंह, नंदा देसाई, भारती गायकवाड़, मंगला ठाकरे, विद्या हिवरकर, मानवी शुगवानी, प्रिया डोर्लीकर यांनी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. इंदू सिंग या सोहळ्याच्या अध्यक्ष होत्या. कार्यक्रमाचे संचालन श्रुती उपाध्ये यांनी केले तर उपस्थितांचे आभार छाया बुटले यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. इनर व्हील क्लब ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून ही संस्था महिला सक्षमीकरण व महिला अत्याचाराविरोधात कार्य करते.
Comments are closed.