प्रेस वेलफेअर सामाजिक बांधिलकी जोपासते: तारेंद्र बोर्डे

वणीत पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0

वणी: प्रेस वेलफेअर असोसिएशन तर्फे पत्रकार दिनी समाजोपयोगी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. पत्रकार हा समाजाचा प्रहरी आहे. त्या नात्याने येथील प्रेस वेलफेअर ही संघटना नेत्र तपासणी सारखे उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासते. असे गौरवोद्गार नगर परिषद वणीचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी काढले. या कार्यक्रमाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्याम धनमने व नेत्र तज्ञ डॉ. जाबिन कैसर उपस्थित होते.

येथील प्रेस वेलफेअर असोसिएशन द्वारा बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात झालेल्या दिवशी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्त जैताई मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यासाठी नागपूर येथील श्री स्वामी समर्थ नेत्रालय वणी येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. या नेत्र शिबिराला जेष्ठ नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या संघटनेचे अध्यक्ष गजानन कासावार यांनी केले. त्यांनतर उदघाटक म्हणून बोलताना विजय लगारे म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ आहे. शासन व प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम निर्भीड पत्रकार करीत असतात. असे प्रतिपादन करून बाळशास्त्री जांभेकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर बोलतांना तहसीलदार धनमने यांनी समाजाची सध्यास्थिती मांडून पत्रकारितेच्या उपयोगाबद्दल विवेचन केले.

या कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र डाबरे यांनी केले. आभार प्रदर्शन रवी बेलूरकर यांनी केले. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ नेत्रालायाचे सचिन वैद्य, नितीन कान्हेरे, अभिजित लोहारे या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सचिव रमेश तांबे, उपाध्यक्ष अनिल बिलोरिया, बंडू निंदेकर, मंगल तेलंग यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.