कपाशीवरील मर रोगावर उपाययोजना करा, तालुका कृषी विभागाचे आवाहन

जाणून घ्या काय करावी मर रोगावर उपाययोजना

0

रवि ढुमणे, वणी: कपाशीवर सध्या मर रोगानं (Parawilt)थैमान घातलं आहे. त्याअधिक प्रमाणात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना करण्यासंबंधी तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी ए एम बदखल यांनी आवाहन केले आहे.

तालुक्यातील बहुतांश भगत कपाशीवर सध्या मर रोग (Parawilt)अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे कपाशीच्या झाडाची पाने पिवळी पडतात आणि ते गळून पडतात. सोबतच कपाशीला लागलेली बोंडे, फुले गळून पडतात. झाड पूर्णतः सुकून जाते. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न पडतो.

काय करावी यावर उपाययोजना ?
शेतात साचून असलेले पाणी प्रथम काढून घ्यावे. रोग झालेल्या झाडावर कॉपर आक्सिक्लोराइड २५ ग्रॅम, २०० ग्राम युरिया, अधिक पोटॅशियम नायट्रेट (१३:०:४५) अधिक हुमिक ऍसिड ५० ग्रॅम १०लिटर पाण्यात घेऊन त्याचे द्रावण स्प्रे पंपाचे नोझल काढून कपाशीच्या झाडाच्या मूळा जवळ टाकावे. ओली माती पायाने दाबून घ्यावी. वरील उपाय चार ते पाच दिवसांच्या अंतराने पुन्हा करावे. ही उपाययोजना करण्याचे आवाहन वणी तालुका कृषी विभागाने केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.