अडेगाव येथे रेशन दुकानात जादा दराने विक्रीचा आरोप
प्रशासनाकडे तक्रार, अधिका-यांनी केली पाहणी
सुशील ओझा, झरी: लॉकडाउनमध्ये अडेगाव येथील रेशन दुकानात शासकीय नियमांचे उल्लंघन करून धान्याची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ४८ रुपयात मिळणारे धान्य ७० रुपये तर ९० रुपयांच्या धान्यासाठी कार्डधारकांकडून १२० रुपये घेतले जात असल्याची तक्रार मंगेश पाचभाई यांनी फोन द्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याजवळ केली.
सध्या लॉकडाऊऩमध्ये रेशनच्या दुकानातून अधिक दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. कार्डधारकांकडून 40 रुपये जास्तीचे घेऊन कोणत्याही धारकांना पावती दिली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीवरून नायब तहसीलदार गोल्हर पुरवठा निरीक्षक मसराम यांनी रेशन दुकानदार राजू करमनकर यांच्या दुकानाला भेट देऊन तेथील कंट्रोल धारकमदार गोल्हर पुरवठा निरीक्षक मसराम यांनी रेशन दुकानदार राजू करमनकर यांच्या दुकानाला भेट देऊन तेथील कंट्रोल धारक महिला व पुरुषांचे बयान नोंदविले. त्या बयानावरून तपास करून लवकरच याबाबतचा निर्णय प्रशासन घेणार आहे.
एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारने जनतेला आश्वस्त करत टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चढ्या भावाने विक्री करणा-या व्यापा-यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र वणी व परिसरात अनेक गावांमध्ये रेशनच्या दुकानात चढ्या भावानं विक्री होत आहे. त्यावर प्रसासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य करीत आहे.