झरी तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
तोंडावरील मास्क गायब, भाजीपाला व किराणा दुकानात गर्दी
सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने नियमांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. यात अऩेक दुकानांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षेबाबतचे निर्णय मात्र आधीसारखेच आहेत. लॉकडाऊनमध्ये बहुतांश दुकाने उघडण्याची मुभा मिळाल्याने जणू काही कोरोनाचा संसर्ग संपला अशा प्रकारचे सर्वसामान्यांचे वर्तन पाहायला मिळत आहे. सध्या झरी परिसात जनतेच्या तोंडावरील रुमाल किंवा मास्क गायब, किराणा, भाजीपाला व फळे खरेदी करीता मोठी गर्दी करून एकमेकांना रेटून खरेदी करीत असताना दिसत आहे ज्यामुळे सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडाला आहे.
लॉकडाऊनमधला लोकांचा आवडता प्रकार म्हणजे खर्रा. सध्या पान टपरीला बंदी असली तरी छुप्या रितीने संपूर्ण लॉकडाऊन काळात खर्रा ग्राहकांना मिळाला आणि आताही मिळतो. लोक खर्रा खाण्याकरिता बसस्टॅण्ड, मजिद चौक, गादेवार चौक, बेघर वस्तीकडे मोठी गर्दी करीत आहे. तर अनेक पानटपरी चालक घरातून विक्री करीत असल्यामुळे गावातही गर्दी दिसत आहे.
बाहेर राज्य तसेच जिल्यातील लोकांना आपापल्या गावी जाण्यास शासनाकडून परवानगी मिळाल्याने नवीन चेहेरे गावाकडे जातांना दिसत आहे. सोशल डिस्टनसिंग नसल्याने नवीन लोकांच्या गर्दीमुळे कोरोनाची साथ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे शासनाने याकरिता कठोर पाऊल उचलावे व गर्दी होऊ नये तसेच जनतेनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावे याकरिता कठोर पाऊल उचलने गरजेचे झाले आहे.
तालुक्यात आजपर्यंत एकही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण नाही परंतु जनतेच्या अशा चुकीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासन स्तरावर मोठी उपाययोजना केल्या जात आहे तर तालुका पातळीवर दक्षता समिती, आरोग्य विभाग व पोलीस विभाग मोठी मेहनत घेताना दिसत आहे परंतु जनतेच्या एका छोट्या चुकीने मोठी परतफेड करावी लागून शकते हे निश्चित.