विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली ते वरझडी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. याबाबत 8 महिन्याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही.
मेंढोली ते वरझडी हे 4 किलोमीटरचे अंतर आहे. मेंढोलीहून वणीला जाण्यासाठी देखील हा शॉर्टकट आहे. या मार्गाने वणी 16 किलोमीटरचे अंतर असून शिरपूर मार्गे हे अंतर 4 किलोमीटर अधिक आहे. त्यामुळे या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शिवाय कायरला जाण्यासाठीही याच शॉर्टकटचा वापर केला जातो. वरझडी येथील सुप्रसिद्ध देवीसाठीही शिंदोला मार्गावरील गावावरून येणा-या भाविकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो.
मात्र मेंढोली ते वरझडी हा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरले जाते. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी स्वारांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 8 महिन्याआधी या बाबात जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र संबंधीत विभागाला काही जाग आली नाही. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकरात काम करावे अशी मागणी केली जात आहे.
(आपण नवीन सुरू केलेल्या ‘समस्या’ या सदरासाठी ही समस्या मेंढोली येथील एका सुजाण नागरिकांनी पाठवलेली आहे. आपणही आम्हाला आपल्या परिसरातील समस्या पाठवू शकता. वणी बहुगुणी पोर्टलवर आपले प्रश्न व समस्येची शहानिशा करून प्रकाशित केली जाईल.)
‘समस्या’ या सदराबाबत आवाहन…
वणी बहुगुणीच्या सर्व वाचकांना आवाहन आहे की हल्ली पावसाचे दिवस सुरु आहे. आपल्या गावात, परिसरात वाराधुंद, पाऊस, अतिवृष्टी, पूर तसेच वीज पडून हानी, पिकांचे नुकसान होते. याशिवाय रस्त्याची दुर्दशा होते. याबाबत आम्हाला लगेच कळवा. आपल्या मोबाईलद्वारे फोटो, व्हिडीओ काढून माहितीसह आमच्या व्हाट्सएप नंबरवर पाठवा. याशिवाय तुमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या, लोडशेडिंग व इतर काही समस्या व तक्रार असल्यास आम्हाला माहिती द्या. आम्ही प्रशासनापर्यंत तुमची समस्या पोहचविण्यास मदत करु.
टीप: फोटो, व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा धरून काढावा.
खालील क्रमांकावर माहिती द्या:-
संपादक: निकेश जिलठे 9096133400
वणी तालुका:
जितेंद्र कोठारी: 9423436056
जब्बार चिनी: 9822238748
विवेक तोटेवार: 9765100974
पुरुषोत्तम नवघरे: 9689181702
शिरपूर विभाग:
विवेक पिदूरकर: 9764426365)
मारेगाव तालुका:
भास्कर राऊत: 9420121311
झरीजामणी तालुका:
सुशील ओझा 9767279154