समस्या: पळसोनी स्मशानभूमीचा प्रश्न अधांतरीच

शेड अभावी मृतकावर भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की

0

जितेंद्र कोठारी, वणी: पळसोनी या गावात स्मशानभूमीला शेड नसल्याचे नागरिकांना उघड्यावरच मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसामध्ये अंत्यसंस्कार करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी पळसोनीतील रहिवाशी करीत आहे.

पळसोनी हे गाव निर्गुडा नदीच्या तिरावर आहे. गावात स्मशानभूमी अभावी नदीकाठी मृतांवर अंत्यसंस्कार गेले जायचे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात गावातील एका 57 वर्षीय इसमाचा अपघाती मृत्यू झाला होता. कोरड्या नदीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच अचानक पाण्याचा लोंढा आल्याने जळत असलेले प्रेत वाहून गेले होते. नागरिकांनी मृतदेहाला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जळत्या सरणासोबत मृतदेह वाहून गेला होता.

या प्रकारानंतर गावक-यांनी स्मशानभूमीची मागणी जोर धरू लागली. गावक-यांतर्फे गावातील एक गायरान जागा निवडण्यात आली. लोकवर्गणी काढण्यात आली व स्मशानभूमीच्या कामाला सुरूवात झाली. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडून 5 लाखांचा निधीही प्राप्त झाला. मात्र स्मशानभूमीचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले. सध्या स्मशानभूमीला शेड नसल्याने उघड्यावरच मृतकाचे अंत्यसंस्कार केले जाते.

सदर जमिनीची नोंदच नाही: प्रकाश भट
सध्या ज्या जागेवर गावक-यांनी स्मशानभूमी तयार केली आहे. त्या जागेची नोंद नसल्याने त्याचे काम अर्धवटच राहिले आहे. खासदारांनी निधी दिला होता. निधी ग्रामपंचायतीकडे आलाही. मात्र जागेची नोंद नसल्याने त्या निधीतून गटग्रामपंचायत झरपट येथे स्मशानभूमी बांधण्यात आली. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधींनी ही समस्या तातडीने सोडवावी अशी आमची मागणी आहे.
:प्रकाश भट, रहिवाशी पळसोनी

(आपण नवीन सुरू केलेल्या ‘समस्या’ या सदरासाठी ही समस्या पळसोनी येथील  कृष्णा चलाख पाठवलेली आहे. आपणही आम्हाला आपल्या परिसरातील समस्या पाठवू शकता. वणी बहुगुणी पोर्टलवर आपले प्रश्न व समस्या शहानिशा करून प्रकाशित केली जाईल.)

‘समस्या’ या सदराबाबत आवाहन…
वणी बहुगुणीच्या सर्व वाचकांना आवाहन आहे की हल्ली पावसाचे दिवस सुरु आहे. आपल्या गावात, परिसरात वाराधुंद, पाऊस, अतिवृष्टी, पूर तसेच वीज पडून हानी, पिकांचे नुकसान होते. याशिवाय रस्त्याची दुर्दशा होते. याबाबत आम्हाला लगेच कळवा. आपल्या मोबाईलद्वारे फोटो, व्हिडीओ काढून माहितीसह आमच्या व्हाट्सएप नंबरवर पाठवा. याशिवाय तुमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या, लोडशेडिंग व इतर काही समस्या व तक्रार असल्यास आम्हाला माहिती द्या. आम्ही प्रशासनापर्यंत तुमची समस्या पोहचविण्यास मदत करु.
टीप: फोटो, व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा धरून काढावा.

खालील क्रमांकावर माहिती द्या:-
संपादक: निकेश जिलठे 9096133400
वणी तालुका:
जितेंद्र कोठारी: 9423436056
जब्बार चिनी: 9822238748
विवेक तोटेवार: 9765100974
पुरुषोत्तम नवघरे: 9689181702
शिरपूर विभाग:
विवेक पिदूरकर: 9764426365)
मारेगाव तालुका:
भास्कर राऊत: 9420121311
झरीजामणी तालुका:
सुशील ओझा 9767279154

हे देखील वाचा:

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.