महिला दिनानिमित्त मारेगावात विविध कार्यक्रमांची रेलचेल

8 मार्चला व्याख्यान तर 9 व 10 मार्चला रॅली, विविध स्पर्धांचे आयोजन

भास्कर राऊत. मारेगाव: महिला दिनानिमित्त मारेगाव शहरात 8 मार्चे ते 10 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन कऱण्यात आले आहे. दिनांक 8 मार्चला नगरपंचायत भवन येथे स्वयंरोजगार विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्वयंस्फूर्ती गृपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दिनांक 9 व 10 मार्च रोजी स्थानिक मैत्री कट्टा गृपतर्फे रॅली, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्त मारेगाव शहरात पहिल्यांदाच विविध कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. बुधवारी 9 मार्च रोजी मैत्री कट्टा तर्फे सकाळी 8 वाजता महिलांची शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली निघणार आहे. यात वेशभूषा, पथनाट्य तसेच लेझीम पथक प्रमुख आकर्षण राहणार आहे. संध्याकाळी 5 वाजता शेतकरी सुविधा भवन येथे महिलांसाठी एकल डान्स, ग्रुप डान्स, वेशभूषा, पथनाट्य इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात 30 वर्षांवरील महिलांना भाग घेता येणार आहे. याच ठिकाणी स्पर्धेनंतर सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहे.

10 मार्च रोजी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्राविण्य मिळवणा-या महिलांचा बक्षिस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिना दुपारे, प्रतिभा डाखरे, दीपक जुनेजा, उदय रायपूरे, बदरुद्दीन काझी इत्यादी परीश्रम घेत आहे.

स्वयंस्फूर्ती महिला समूहातर्फे व्याख्यान
मारेगाव येथील स्थानिक स्वयंस्फूर्ती महिला गृपतर्फे मंगळवारी 8 मार्च 2022 रोजी महिलांसाठी स्वयंरोजगार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान दुपारी 3 ते 5 दरम्यान नगरपंचायत सभागृह, मारेगाव येथे घेण्यात येणार आहे. याशिवाय महिलांसाठी विविध स्पर्धेचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्वयंस्फूर्ती गृपतर्फे करण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय फेरफारमध्ये बदल, प्रशासनाचा अजब कारभार

कंत्राटदारांनी घरीच तयार केल्या बँकेच्या 18 लाखांच्या मुदत ठेव पावत्या !

आता तुमच्या लहान बाळाची सर्व शॉपिंग एकाच छताखाली

 

Comments are closed.