कंत्राटी नोकरी भरती विरोधात वणीत आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: सरकारी भरतीला पर्याय म्हणून सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे यासाठी 9 कंपन्यांना ठेका देखील देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा वणीत निषेध करण्यात आला. यावेळी तहसिल कार्यालयासमोर तरुण व विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करत याबाबत निवेदन दिले. लढा संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले होते.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती रखडली आहे. अनेक सुशिक्षित विद्यार्थी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करीत आहे. मात्र शासनाचा कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा निर्णय बेरोजगार तरुण तरुणींच्या स्वप्नांवर पाणी फिरवणारा आहे. या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे जीवन अंधकारमय होईल व त्यांना की बड्या कंपन्याची गुलामगिरी करावी लागेल.

संबंधीत शासन निर्णयामुळे आरक्षणाची मागणी सुद्धा धोक्यात आलेली आहे. कंत्राटी पद्धतीने काम करत असल्यमुळे भविष्यात त्यांची नोकरी कायम राहील किंवा नाही ही भिती सुद्धा तरुणांच्या मनामध्ये सतत राहील. त्यामुळे हा निर्णय़ तात्काळ रद्द करावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे, ऍड, रुपेश ठाकरे, विकेश पानघाटे, वैभव ठाकरे, ललित लांजेवार, राहुल झट्टे, महादेव तुराणकर, सुभाष लसंते, अजय कवरसे, सीमा कुमरे, पायल टिपले, सुरभी महाकुलकार, विलासनी काशीकर, तानिया पठान, प्रियंका गेडाम श्रद्धा राजुरकर, अश्विनी वाघमारे, पायल टेंभुरकर, वैष्णवी चेंदे, करिश्मा आडे, स्वरा उईके, निलिमा मोन, प्रिया राजुरकर, प्रतिक्षा पांगुल, नेहा ठाकरे, काजल बोबडे, निकिता बावने,

पलाश मोतेकर, ज्ञानेश्वर कोरडे महादेव तेजे, अक्षय नालमवार, गणेश किनाके, मयूर बेलेकर प्रफुल मोहितकर वैभव चिंचोलकर आकाश हिवरे हेमंत क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित होते.

Comments are closed.