जब्बार चीनी, वणी: बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी वणीत कर्नाटकचे मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळून निषेध केला. रविवारी दुपारी शिवेसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी येदिरप्पा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कर्नाटक सरकारने मनगुत्ती या गावात असलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा रातोरात हटवला होता. ही बातमी समोर येताच राज्यभरात याचे पडसाद उमटले. वणीतही संतप्त शिवसैनिकांनी एकत्र येत टिळक चौकात कर्नाटक सरकारचा निषेध करत मुख्यमंत्री येदुरप्पा यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध केला.
भाजपचा खरा चेहरा उघड – विश्वास नांदेकर
छत्रपती शिवरायांपासून केवळ महाराष्ट्रच नाही संपूर्ण देश प्रेरणा घेते. गावाने ठराव घेऊन शिवरायांचा पुतळा बसवला. मात्र कर्नाटकातील भाजप सरकारच्या ते पचनी पडलं नाही व त्यांनी रातोरात पुतळा हटवला. ‘शिव छ्त्रपतींचा आशीर्वाद’ म्हणून मत मागणा-या भाजपला याबाबत लाज वाटली पाहिजे. या घटनेमुळे भाजपची छत्रपती शिवरायांविषयीचा दुतोंडी भूमिका व खरा चेहरा समोर आला आहे. घराघरात ज्या व्यक्तीचा पुजले जाते. जी व्यक्ती महाराष्ट्राला प्रेरणा देते अशा दैवताचा अवमान सहन केला जाणार नाही.
– विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना
या आंदोलनात तालुका प्रमुख रवि बो़डेकर, गणपत लेडांगे, अनिल राजूरकर, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा, महेश चौधरी, अजय चन्ने, प्रकाश बलकी, अभय सोमलकर, टिकाराम खाडे, सतिश व-हाटे, सचिन मत्ते, राजू देवडे, अनुप चटप, कुणाल लोनारे, बंटी येरणे, नीलेश करजबुजे, राकेश नगरकर, बन्टी सहानी, प्रशांत दुबे, स्मिता नांदेकर, उषा ढवस, सुनंदा गोहे, वर्षा पोतराजे, जीवन डवरे, मंगेश मत्ते, नीलेश करडबुजे, अजय नागपुरे, आदेश कोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.