वणीतील राज्य उत्पादन शुल्काचे कार्यालय रामभरोसे

श्री गुरुदेव सेनेच्या महिलांनी चिपकवले दारूबंदीच्या मागणीचे निवेदन 

0
 वणी: श्री गुरुदेव सेनेच्या वतीने अवैध दारूविक्री बंद करण्याची  मागणी घेऊन आलेल्या महिलांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात कोणीच नसल्याने संतापलेल्या महिलांनी आज ता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाचे गेटलाच निवेदन चिपकवून आपला निषेध नोंदविला.
मौजा बोर्डा ता.वणी येथे प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री चालू असल्याने गावातील तरुण व शाळकरी विद्यार्थी नशेच्या आहारी जात आहे. एवढेच नाही तर दिवसभर काम करणारा मजूरदारसुद्दा काम करण्याऐवजी दारू पिऊन घराच्या महिलांना मारहाण करीत असतो यामुळे महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहे. यामुळे आज श्री गुरुदेव सेनेच्या असंख्य महिलांनी सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर व मुख्य संघटक मिलिंद पाटील यांचे नेतृत्वात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय गाठले असता या कार्यालयाला चक्क कुलूप आढळून आले.
संबंधित अधिकाऱ्यांना दुरध्वनीने संपर्क केला असता ते कोणतेही उत्तर देत नसल्याचे पाहून महिला चांगल्याच संतापल्या व त्यांनी चक्क निवेदन कार्यालयाच्या गेटला चिकपवून आपला निषेध नोंदविला. या नंतर सदरच्या मागणीचे निवेदन पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांना दिले असता त्यांनी दोन दिवसात बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सेनेच्या संघटिका किरण पायघन, मनीषा मंडाले साधना चांदेकर, मंदा मडावी, संगीता सीडाम, निर्मला राऊत, रेखा पडवे, अनुपमा मेश्राम, सुमित राऊत, सुमन राऊत, अंजना गजबे, कालाबाई कोडापे, विजय नगराळे, सागर गोचे, सतीश राजूरकर, सचिन काळे, निलेश झाडे, संतोष बेसरकर विजय आस्वले, प्रणित मडावी, चेतन काकडे आदी उपस्थित होते.
Leave A Reply

Your email address will not be published.