मणिपुर घटनेच्या विरोधात वणी येथे जाहीर निषेध रैली

जितेंद्र कोठारी, वणी : संपूर्ण देशाला हादरवणार्‍या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात वणी येथे रविवार 23 जुलै रोजी जाहीर निषेध रैलीचे आयोजन करण्यात आले. मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून दंगली सुरू आहेत. त्यातच 2 आदिवासी महिलांवर सामूहिक अत्याचार तथा नग्न करून त्यांची धिंड काढण्याचा घृणास्पद व्हिडिओ समोर आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. संपूर्ण जगात या घटनेमुळे संताप उसळला आहे.

मणिपूरमध्ये मागील 2 महिन्यापासून हिंसाचार सुरु आहे. अशावेळी देशाचे पंतप्रधान एक शब्द न बोलता मौन बाळगून आहे. त्यामुळे अशा बिकट प्रसंगी राष्ट्रपतीनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून मणिपूर येथील सरकार बरखास्त करावे. तसेच स्त्रियांची नग्न धिंड काढणाऱ्या नराधमांना कठोर कारवाई करून फाशी देण्यात यावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी आग्रही मागणी देशाच्या राष्ट्रपतीकडे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. त्याच बरोबर राळेगावमधील पाथरी येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीना अटक करून कठोर शासन करावे, असेही निवेदन देण्यात आले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक मार्गे काढण्यात आलेल्या या निषेध रॅलीत जिजाऊ ब्रिगेड, राणी दुर्गावती आदिवासी संघटना, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, धनगर समाज संघटना, परीट समाज संघटना, बिरसा ब्रिगेड, तेली समाज संघटना, मुस्लिम संघटना, बौद्ध समाज संघटना, ओबीसी समाज संघटना, सेवानिवृत्त शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती, महिला बचत गट, छत्रपती संभाजी महाराज बचत गट, बसपा, युवा महिला सेना यांसह अनेक संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. यावेळी मणिपूरमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या मणिपूर सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी संपूर्ण वणी परिसर दणाणून सोडला.निषेध रेलीमध्ये आशा कोवे, लता मडावी, माया पेंदोर, माया आसुटकर, सरिता घागे, छाया वागदरकर, सोनाली जेणेकर, वसुधा ढाकणे, स्वप्ना पावडे, हर्षदा चोपणे, सीमा पोटदुखे, पूनम भोयर, सुनिता वागदरकर, जयश्री मानकर, रेखा बोबडे, काळे मॅडम, किरण नांदेकर, किरण गोडे, विशाखा चौधरी, मीनाक्षी टोंगे, सीमा डोहे, निशा खामनकर, नत्थू नगराळे, अंबादास वागदरकर, अजय धोबे, नितीन मोहितकर, अमोल टोंगे, वसंत थेटे, विनोद बोबडे, मंगेश खामनकर, दत्ता डोहे, नितीन मोवाडे, प्रविण खंडाळकर, रवी चांदणे, शैलेश राऊत, विनोद बल्की, ईश्वर राऊत, दिगंबर ठाकरे, देवेंद्र खरवडे, प्रविण खानझोडे, भास्कर कुमरे, कृष्णदेव विधाते, विलास शेरकी, प्रदिप बोरकुटे, अशोक चौधरी, दत्ता पुलेनवार, अशोक पिंपळशेंडे, सुभाष पाचभाई, वैभव ठाकरे, नामदेव जेणेकर आणि बहुसंख्य वणीकर महिला पुरुष सहभागी झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.