डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला सुरक्षा पुरवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तेली फैल येथे सुरू होणा-या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. मात्र शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या लक्षात घेऊन हे हॉस्टिटल लवकरात लवकर सुरू करावे व हॉस्पिटलला तात्काळ सुरक्षा पुरवावी ही मागणी घेऊन सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Podar School 2025

निवेदनात म्हटले आहे की शहरातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज रुग्णांची संख्या 500 च्या वर पोहोचली आहे. दिवसाला 40-42 रुग्ण आढळत आहे. तालुक्यात सुसज्ज व सर्व सेवा सुविधा असेलेले कोविड हॉस्पिटल नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी रुग्णांना यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद इत्यादी ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. मात्र तिथे देखील बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरात त्वरित डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू झाले तर नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उपचार मिळेल व बाहेर गावी जाऊन उपचार घ्यावा लागणार नाही. कोविड रुग्णांना वेळीच उपचार मिळाला नाही तर जीवही गमवावा लागण्याची शक्यता आहे. शहरातील शासनाच्या आदेशानुसार तेली फैल येथील लोढा हॉस्पिटल येते खाजगी कोविड हॉस्पिटल तयार करण्याची परवानगी मिळताच काम सुरू झाले आहे. मात्र हॉस्पिटल बाबत गैरसमज पसरले जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत त्याचे काम बंद पाडले आहे.

हे हॉस्पिटल स्थानिकांच्या सोयीसाठी आहे. हे हॉस्पिटल सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरात उपचारासाठी धाव घ्यावी लागणार नाही. त्यामुळे या हॉस्पिटलला सुरक्षा पुरवावी व लवकरात लवकर हॉस्पिटल सुरू करण्यास पावलं उचलावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वणी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष जयसिंग गोहोकार, विजयालक्ष्मी आगबत्तालवार जिल्हा सरचिटणीस, सूर्यकांत खाडे तालुका अध्यक्ष, सविता ठेपाले शहर अध्यक्ष, आशिष मोहितकर जिल्हा सरचिटणीस, महेश पिदूरकर जिल्हा उपाध्यक्ष आदी उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.