‘त्या’ घटनेचा रफीक रंगरेज कडून जाहीर निषेध

घटनेला जातीयवादी स्वरूप न देण्याचे केले आवाहन

 

जितेंद्र कोठारी, वणी : जागेच्या वादावरून येथील नवकार फर्निचरची दुकान जेसीबी मशीन लावून उध्वस्त केल्याची घटनेचा आरोपीचे वडील रफीक रंगरेज यांनी तीव्र निषेध केला आहे. रफीक रंगरेज यांचे पुत्र समीर रंगरेज यांनी पंकज बन्सीलाल भंडारी यांची फर्निचर दुकान जेसीबी लावून पाडली होती. मुलाने केलेल्या कृत्याचा मी निषेध करीत आहे असे त्यांनी जाहीर केले आहे.

या घटनेला काही राजकीय नेत्यांनी जातीयवादी स्वरूप देण्याच्या प्रयत्न केल्याचाही कठोर शब्दात त्यांनी निषेध केला. वणी शहर हे अमन, शांती आणि भाईचारेचा प्रतीक आहे. परंतु काही लोकांकडून राजनैतिक आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रफीक रंगरेज यांनी शहरात शांतता आणि सामाजिक एकोपा कायम ठेवण्याचा आवाहन नागरिकांना केला आहे. 

Comments are closed.