ड्युटीवर जाण्याच्या तयारीत असताना त्याला आला हार्टअटक

झरी तालुक्यातील मार्की येथील युवकाचा हृद्यविकाराच्या झटक्याने निधन

जितेंद्र कोठारी, वणी : हृद्यविकाराच्या धक्क्याने झरी जामणी तालुक्यातील मार्की येथील युवकाचा मृत्यू झाला. संजय भाऊराव मांडवकर (45) रा. मार्की असे मृतक युवकाचा नाव आहे. मृतक संजय हा टॉपवर्थ उर्जा या खाजगी कोलमाईन्स मध्ये कामगार होता. रविवार 15 ऑक्टो. रोजी रात्री संजय व त्याची पत्नी जेवण करून झोपी गेले होते. सकाळी 7 वाजता दरम्यान संजय आंघोळ करून टॉवेल गुंडाळून बाजूच्या वाभिटकर यांच्या कृषी केंद्र दुकानावर गेला होता.

दुकानावर उभा असताना त्यांनी दुकानदाराला कस तरी वाटत असल्याचे सांगून परत घरी गेला. घरी जाताच तो अचानक जमिनीवर कोसळला. संजय याची पत्नी शालू हिने आरडाओरड करताच आजुबाजूचे लोकं जमा झाले. संजय याला तत्काळ एका वाहनात मुकुटबन येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी वणी रेफर केले. संजय याला  वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियाना देण्यात आले आहे.

मृतक संजय याच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ असा आप्त कुटुंब आहे. अत्यंत हुशार आणि मनमिळाउ स्वभावाचे संजय मांडवकर यांनी अचानक एग्जीट केल्याने मार्की गावात शोककळा पसरली आहे.   

Comments are closed.