पर्समधून चोरट्यांनी लुटला दोन लाखांचा ऐवज

एक लाख रोख व दागिने लंपास

0

विवेक तोटेवार, वणी: वणीमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने एक लाख रुपये रोख व सुमारे एक लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर वणी बसमधून प्रवास करीत असलेल्या एका महिलेचा पर्समधून चोरट्यानी दागिने व एक लाख रुपयांची रोख लंपास केल्याची घटना घडलीआहे.

सुनीता मधुकर वेलेकर (58) या भद्रावती येथे राहतात. त्यांची वणी जवळील पिंपळगाव येथे शेती आहे. त्यामुळे त्यांचे वणीत नेहमीच ये-जा असते. वणीजवळ शेती असल्याने त्यांच्या बँकेचे अकाउंटही वणीतच आहे. 25 फेब्रुवारीला त्यांच्या वणीत पुतणीचे साक्षगंध होते. त्यामुळे कापसाच्या चुका-याचे मिळालेले एक लाख रुपये बँकेत टाकण्यासाठी व कार्यक्रमाला घालण्यासाठीचे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवले.

वणीला येण्यासाठी त्या सकाळी भद्रावतीवरून चंद्रपूर-वणी या गाडीत बसल्या. सकाळी 10.45 वाजता त्या दत्त मंदीर स्टॉपवर उतरल्या. उतरल्यावर पर्स उघडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पर्समध्ये बघितल्यावर त्यांना 1 लाख रुपये व सोन्याची चपलाकंठी किंमत 84 हजार व एक सोन्याची अंगठी किंमत 4 हजार कुणीतरी चोरल्याचे लक्षात आले.

शनिवारी त्यांनी वणी पोलीस ठाणे गाठले व अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंद केली. सुनीता यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोऊनी विजयमाला रिठे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.