कव्वालीच्या कार्यक्रमाने वणीकर मंत्रमुग्ध

देशभक्तीपर शेरोशायरी आणि कव्वाल्लीत रसिक धुंद

0

विवेक तोटेवार, वणी:
दिलों की नफरत को निकालो,
वतन के इन दुश्मनो कों मारो
ये देश खरते मे ए मेरे हमवतन
भारत माँ के सम्मान को बचा लो…

अशा एकसे एक देश भक्ती पर शेरो शायरी आणि भक्ती शेरोशायरीने वणीकरांना चांगलेच मंत्रमुग्ध केले. शनिवारी बाबा ताजोद्दीन उर्स निमित्त संध्याकाळी चार वाजता सुप्रसिद्ध कव्वाल अनिस नवाब यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे पाच तास रंगलेल्या या कव्वालीच्या मैफलीने रसिक धुंद झाले. या कार्यक्रमाला आमदार ख्वाजा बेग यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा होते. आज संध्याकाळी शाही संदल म्हणजेच शोभायात्रेने या उत्सवाची सांगता होणार आहे.

संध्याकाळी चार वाजता ‘महफिले कव्वाली’ या कव्वालीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला अनिस नवाब यांनी बाबा ताजोद्दीन यावरची कव्वाली सादर केली. सुमारे दिड तास ही कव्वाली चालली. त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्टेजवर ख्वाजा बेग, डॉ. महेंद्र लोढा, राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे यांच्यासह उर्स कमिटी हजर होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्यातर्फे अनिस नवाब यांचा सत्कार कऱण्यात आला. यावेळी ख्वाजा बेग यांच्या देशभक्तीपर शेरो शायरीने रसिकांमध्ये उर्जा निर्माण झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की देशात सामाजिक आणि धार्मिक एकता टिकली तरच देश टिकेल. समाजातील ही एकता टिकवण्यासाठी असे सर्वसमावेशक कार्यक्रम होण्याची गरज आहे.

यानंतर कार्यक्रमाचे संयोजक डॉ. महेंद्र लोढा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की तब्बल 12 वर्षांनंतर वणीत कव्वालीचा कार्यक्रम आयोजित होतोय याचा मला आनंद आहे. सांस्कृतिक कार्यक्रम हा सामाजिक सलोखा, धार्मिक सलोखा वाढवण्याचं काम करतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे उर्स कमिटीचा मोठा हात आहे. त्यांच्या परिश्रमामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होत आहे असेही ते म्हणाले.

सत्कार कार्यक्रमान्ंतर पुन्हा कव्वालीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर देशभक्तीपर आणि धार्मिक कव्वाली झाल्या. या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील सुमारे पाच हजारांपेक्षाही अधिक रसिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले तर संचालन अशपाक सय्यद यांनी केले. आज संध्याकाळी शाही संदल या कार्यक्रमाने उर्सची सांगता होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.