बहुगणी डेस्क, वणी: एका म्हणीनुसार दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होतो. मात्र कधीकधी याच्या अगदी उलटच होतं. याचा प्रत्यय एस.टी महामंडळात चालक असलेल्या लालगुडा स्थित नंदू उर्फ लकी मेश्राम (37) यांना आला. त्यांना सुरू असलेलं भांडण सोडवणं चांगलंच महागात पडलं.
लकी मेश्राम याचा लालगुडा चौपाटीवर पानठेला आहे. तिथे त्याला काही लोकांचे भांडण सुरू असलेलं दिसलं. माणुसकीच्या नात्यानं ते भांडण सोडवायला गेलेत. मात्र आरोपीने त्यांच्या भांडणात मध्ये पडू नको म्हणून लकी यांना बजावलं. त्यावरच आरोपी थांबले नाहीत. त्यांनी लाकडी काठीने लकीच्या डाव्या पायाला मारहाण केली. तसेच आरोपी गणेश साळुंखे व त्याच्या एका सोबत्यानं फिर्यादीला लाथांनी मारलं.
ही घटना 18 मार्चला सकाळी 10.20 च्या सुमारास लालगुडा चौपाटीवर घडली. नंतर लकीचा भाऊ रामू मेश्राम यांनी याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार आरोपी दिनेश साळुंखे, गणेश साळुंखे आणि एका अज्ञात पुरुषावर कलम 118(1), 3(5) अन्वये गुन्हे दाखल झालेत. लकीला चंद्रपूर येथे उपचारासाठी रेफऱ करण्यात आले आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. गजानन होडगीर करीत आहेत.
Comments are closed.