रास दांडिया 2023 ला सुरुवात, 1.25 लाखांची बक्षिसे

दररोज सायकल, चांदीचे नाणे तर बम्पर प्राईज होन्डा ऍक्टिव्हा जिंकण्याची संधी

बहुगुणी डेस्क, वणी: जैताई माता दांडिया उत्सव समितीद्वारा रास दांडिया 2023 या गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छ. शिवाजी महाराज उद्यान येथे दिनांक 16 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पर्यंत हा दांडिया उत्सव चालणार आहे. या उत्सवात सहभागी होणा-या स्पर्धकांसाठी रोज विविध बक्षिसांची लयलूट असून एकूण 1.25 लाखांची बक्षिसे स्पर्धकांना जिंकता येणार आहे. विजय चोरडिया, तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातून व जेसीआय वणी, कशिश फिटनेस क्लब तर्फे या दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर रास दांडिया स्पर्धा ही तीन गटात राहणार आहे. यात अ गट हा 15 वर्षांपुढील महिलांचा, ब गट हा 15 वर्षांपुढील पुरुषांचा तर क गट हा 7-15 वर्षातील मुला-मुलींसाठीचा आहे. स्पर्धेत दररोज 2 लकी विजेत्याला सायकल, प्रत्येक गटातील 1 विजेत्याला चांदिचे नाणे जिंकता येणार आहे. तर सुपर बम्पर प्राईज म्हणून होन्डा ऍक्टिव्हा जिंकता येणार आहे.

या कार्यक्रमाच्या एन्ट्रीसाठी पास गरजेचा असून सिंगल महिलांसाठी 150 रुपये, तर कपल एन्ट्री पास 250 रुपये तर संपूर्ण कुटुंबासाठी (5 व्यक्ती) 400 रुपयांचा पास आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

 

Comments are closed.