सेवानगरमध्ये राडा: एकावर लोखंडी रॉडने प्रहार

शुल्लक कारणावरून दोन कुटुंबात वाद, तिघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सेवानगर येथे दोन कुटुंबामध्ये वाद झाला. या वादातून एक कुटुंबातील तिघांनी दुस-या कुटुंबातील 4 जणांना शिविगाळ करीत मारहाण केली. यात एक जखमी तर तिघे किरकोळ जखमी झालेत. सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास सेवानगरमध्ये ही घटना घडली. जखमी कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी अर्जून गोपाल आदे (30) हा रंगनाथनगर येथील रहिवासी आहे. त्याची सेवानगर येथील साहिल कैलाश पुरी (19) याच्यासोबत ओळख आहे. मैत्री असल्याने साहिल हा नेहमीच अर्जून याच्या घरी येजा करतो. सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी साहिल हा बराच वेळे घरी नव्हता. अखेर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास साहिलचे आई वडिल त्यांच्या मुलाचा शोध घेत रंगनाथ नगर येथे अर्जूनच्या घरी गेले.

बराच वेळेपासून आमचा मुलगा घरी नाही, त्यामुळे तुम्हीच आमच्या मुलाला घरी आणून सोडा, अशी ताकीद देत त्यांनी अर्जूनच्या कुटुंबीयांना शिविगाळ केली. त्यानंतर ते रंगनाथ नगरहून घरी निघून गेले. अर्जून घरी आल्यावर त्याला साहिलचे आईवडील घरी येऊन वाद घालून गेल्याचे कळले. रात्री 9 वाजताच्या सुमारास अर्जून हा त्याची आई, पत्नी सुनीता, भाऊ व त्याची पत्नी यांना सोबत घेऊन सेवानगर येथे साहिलच्या घरी गेले. तेव्हा त्यांना साहील घरीच आढळला. तुमचा मुलगा घरीच असताना तुम्ही माझ्या घरी येऊन वाद का घातला, असा जाब त्यांनी साहिलच्या आईला विचारला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान दोन्ही कुटुंबातला वाद वाढत गेला. दरम्यान साहिलच्या वडिलांनी आमच्या घरासमोर येऊन तुम्ही वाद का घालत आहात अशी विचारणा अर्जूनच्या कुटुुंबीयांना केली. अखेर साहिलचे वडिल कैलास पुरी चिडले. त्यांनी अर्जूनच्या आईला शिवीगाळ करत मारण्यास सुरवात केली. त्यानंतर कैलास यांनी लोखंडी वस्तूने अर्जूनच्या डोक्यावर प्रहार केला. यात अर्जून जखमी झाला. या मारहाणीत अर्जून जखमी झाला तर यांची आई व त्याच्या भावाची पत्नी किरकोळ जखमी झालेत.

झालेल्या मारहाणीमुळे अर्जून याने रात्रीच वणी पोलीस स्टेशन गाठले. याबाबत तक्रार दिली. वणी पोलिसांनी साहिल, त्याची आई व कैलास पुरी यांच्या विरोधात बीएनएसच्या कलम 115 (2), 118 (1),3 (5), 35 (2), 351 (3), 352 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर

Comments are closed.