दीपक टॉकीज चौपाटीवर राडा, दोन्ही गटातील लोकांवर गुन्हा दाखल

मारहाण करून खंडणी मागितल्याचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक चौपाटी परिसरात एकाला मारहाण करून तीन लाखाची खंडणी मागितल्याची घटना घडली. बुधवारी दिनांक 31 जुलै रोजी सध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, आरिफ रहेमान खलील रहेमान (रा. काळे लेआउट, वणी) यांचे वणीतील किराणा दुकान आहे. तो बुधवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास दीपक चौपाटी परिसरातील अब्बास नामक इसमाच्या दुकानाजवळ उभा होता. त्याचवेळी त्याठिकाणी शेख सद्दाम शेख उस्मान रा. रंगनाथनगर वणी, क्षितिज लहानू इंगळे रा. रंगनाथनगर, जुबेर खान अकबर खान रा. काझीपुरा, फैजल खान फिरोज खान रा. मोमिनपुरा, अब्दुल फरहान अब्दुल गफ्फार रा. मोमिनपुरा हे पाचजण आरिफजवळ आले.

या पाच जणांनी त्याला तुम्ही दोन नंबरचे धंदे करता, असे म्हणून यापैकी शेख सद्दाम शेख उस्मान याने अश्लील शिवीगाळ केली. धंदा करायचा असेल, तर आमच्या बॉसशी बोलून घ्या, असे म्हणत त्याच्या मोबाइलवरून फारूक चिनी यांना फोन लावला. या दोघात संभाषण झाले. त्यानंतर फोन कट करून शेख सद्दाम याने शिवीगाळ करत आरिफ रहेमान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याच वेळी त्यांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व खिशातील एक हजार 640 रुपये काढून घेतले, असे देखील तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीत जखमी झाल्यानंतर पोलिसांनी आरिफ रहेमान यांना वणी ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. याप्रकरणी वणी पोलिसांनी सद्दाम उस्मान शेख, क्षितिज लहानू इंगळे, जुबेर खान अकबर खान, फैजल खान फिरोज खान, अब्दुल फरहान अब्दुल गफ्फार व फारूक चिनी यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

काय आहे दुसरी तक्रार?
दुस-या तक्रारीनुसार, शेख सद्दाम शेख उस्मान हा दीपक टॉकीज चौपाटीजवळ मटका लावण्यासाठी गेला होता. त्याने मटका लावला व चुकारा घेण्यासाठी तो आरीफ कडे गेला. मात्र त्याने सद्दामचा मोबाईल व मोपेडची चावी हिसकावली. तसेच व्हिडीओ काढल्याचा आरोप लावत काठीने मारहाण केली. तसेच शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली असे देखील तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार आरोपीवर विविध बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.