निकेश जिलठे, वणी: वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुंभारखणी कोळसा खाण कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या वसाहतीजवळ कोंबड बाजार सुरू होता. याबाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. कारवाईत सुमारे 52 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पांडुरंग नथ्थुजी क्षीरसागर (३५) रा. सुकनेगाव, देवराव सोनु मेश्राम (४५) रा. बोटोणी, खुलेश्वर वसंता काटकर (४०) रा.घोन्सा, मधुकर नामदेव ठेंगणे (२९) रा. गोधनी, अनिल वासुदेव खारकर (४०) रा. कोलगाव साखरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मागील अनेक दिवसांपासून या परिसरात खुलेआम कोंबड बाजार सुरू होता. याबाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी रविवारी दुपारी या कोंबड बाजारावर धाड टाकली. यावेळी अनेकजण सैरावैरा पळून गेले. दरम्यान, पाचजणांना पकडण्यात वणी पोलिसांना यश आले.
या कारवाईत पोलिसांनी तीन कोंबडे, तीन दुचाकी, तीन धारदार काती, असा एकूण ५१ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुदाम आसोरे व पथकाने केली.
Comments are closed.