पहाटे पहाटे मारेगाव येथे पोलिसांनी आवळल्या दारु तस्करांच्या मुसक्या

सुमारे 4 लाखांची दारू जप्त, दोघांना अटक तर दोघे फरार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे पोलिसांनी दारू तस्करांर कारवाई करत सुमारे 4 लाखांच्या देशी दारुसह दोन कार व एक दुचाकी जप्त केली. मंगळवारी पहाटे 4.30 वाजताच्या वाजताच्या सुमारास एसडीपीओ पथकातर्फे ही कारवाई केली. सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून दुकान मालक व एक आरोपी फरार आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की मारेगाव येथील राज्य मार्गावर असलेल्या अक्षरा बारमागे ए वाय जयस्वाल यांचे देशी दारुचे दुकान आहे. भट्टीचे मालक नीलेश जयस्वाल हा त्याच्या दुकानातून चंद्रपूर येथे अवैधरित्या दारू सप्लाय करणार असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला मिळाली. त्यावरून मंगळवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस पथक तिथे पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना दुकानासमोर दोन स्विफ्ट डिजायर गाडी (MH02 BG 4643) व (MH31 EA4338) उभ्या होत्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या दोन्ही कारमध्ये दारूच्या पेट्या ठेवल्या जात असल्याचे पोलिसांना आढळून आहे. पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. अचानक मारलेल्या धाडीमुळे तस्करांचा गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ प्रमोद कृष्णाजी ठेंगणे (33) रा. मारेगाव व अतुल रामदार व-हाटे (31) रा. घोडदरा हल्ली मुक्काम मारेगाव यांना ताब्यात घेतले.

या कार्यवाहीत पोलिसांनी घटनास्थळावरून 152 पेट्या देशी दारू ज्याची किंमत 3 लाख 88 हजार 128 रुपये व दोन कार ज्याची किंमत 6 लाख व एक दुचाकी ज्याची किंमत 30 हजार रुपये असा एकूण 10 लाख 18 हजार 128 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी घटनास्थळी आढळून आलेले प्रमोद ठेंगणे, अतुल व-हाटे यांच्यासह दुकान मालक नीलेश जयस्वाल व एका फरार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार, पोलीस हवालदार आनंद अलचेवार, ना.पो.का. विजय वानखेडे, इकबाल शेख, प्रदीप ठाकरे, रवी इसनकर, परेश मानकर, नितीन खांदवे, बंटी मेश्राम, शेख कलिम यांनी केली.

हे देखील वाचा:

दुचाकीची उभ्या ट्रकला जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

देशी दारुची तस्करी करताना ग्रामीण रुग्णालयाजवळ एकाला अटक

Leave A Reply

Your email address will not be published.