गुरुनगर येथील क्रिकेट बेटिंग (सट्टा) अड्ड्यावर धाड

एकाला अटक, दुसरा फरार... मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: येथील गुरुनगर भागात एका घरात सुरु क्रिक्रेट सामन्यावर सट्टा खेळताना वणी पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. इरशाद खान उर्फ इशरत खान (36) रा. वणी असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. तर अरविंद उर्फ बाप्या मडावी (30) रा. वणी हा फरार झाला आहे. 

स्थानिक डीबी प्रमुख सपोनि आनंद पिंगळे याना क्रिकेट बॅटिंगवर सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीवरून डीबी पथकाने दि. 24 सप्टें. रोजी रात्री 9 वाजता दरम्यान गुरुनगर भागात एका घरावर छापा टाकला. तेव्हा तिथे दोन इसम रॉयल चॅलेंज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल क्रिकेट संघात शारजहा येथे सुरु असलेल्या सामन्यावर जुगार खेळताना आढळले.

पोलीस पथकाने त्या ठिकाणी असलेले इरशाद खान उर्फ इशरत खान या इसमाला ताब्यात घेतले. तर दुसरा इसम नामे अरविंद उर्फ बाप्या मडावी हा पोलिसांची नजर चुकवून फरार होण्यास यशस्वी झाला. पोलिसांनी त्या घरातून 1 लॅपटॉप, 3 मोबाईल, रोख 1350 रुपये आणि जुगार साहित्य असे एकूण 76350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुद्द कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

फरार आरोपीचे शोध सुरू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार व पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक आनंद पिंगळे, हेड कॉन्स्टेबल सुदर्शन वानोळे, नापोका. अशोक टेकाडे, हरींदर भारती, पोलीस कॉन्स्टेबल पंकज उंबरकर, रत्नपाल मोहोड, विशाल गेडाम, मो. वसीम, शंकर चौधरी, दीपक वांड्रसवार यांनी केली.

हे देखील वाचा:

‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु

 

Comments are closed.