रेल्वखाली कटून निवृत्त मिल्ट्रीमॅनचा मृत्यू

नवरगाव-वडजापूर दरम्याची घटना...

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी तालुक्यातील नवरगाव येथील एका इसमाची रेल्वेखाली कटून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. नवरगाव ते वडजापूरच्या मध्ये हा अपघात झाला.

Podar School 2025

रामदास जेणेकार (42) हे नवरगाव येथील रहिवाशी होते. 9 जुलैला ते कायर येथे कामानिमित्त गेले होते. रात्री त्यांना घरी परतायचे होते. मात्र मुसळधार पावसामुळे नवरगावकडे जाणार रस्ता बंद झाला. त्यामुळे ते रात्री उशिरा रेल्वे ट्रकने घराकडे येत होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरम्यान रात्री पूर्णा-पटणा ही एक्सप्रेस या मार्गावरून जाते. अचानक आलेल्या रेल्वेने त्यांना धडक दिली व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की त्याचे धड खाली नालीत पडले. तर पाय रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडला.

 पहाटे ही घटना उघडकीस आली. ही घटना माहित होताच परिसरातील लोकांची बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे मृतक हे मिल्ट्री मध्ये नोकरीवर होते व त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर लेबर कोर्टात त्यांना सेक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली असल्याचीही माहिती समोर येत आहे.

निवृत्तीनंतर त्यांना शासनाकडून जमीन मिळाली होती. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. रामदास यांच्या मागे सासू, सून व नातू असा परिवार होता. रामदास यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.