भर उन्हाळ्यात प्रवाशांची तहान भागविणाऱ्यांचा सत्कार

महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: वणीतील रेल्वे स्थानकावर एप्रिल व मे महिण्यात महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे रेल्वेनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निशुल्क पाणी वाटप करण्यात आले. या संस्थेतील कार्यकर्त्यांनचा सत्कार समारंभ सोमवार 24 जून सायंकाळी 8 वाजता येथील बाजोरिया हॉल येथे मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत पार पडला.

महावीर बहुउउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे वणीच्या रेल्वे स्थानकावर भर उन्हाळ्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुद्ध व थंड पाणी वाटप करण्यात आले. या कार्यात संस्थेच्या लहान मुलांपासून तर जेस्थापर्यंत सर्वांनी श्रम घेतले. या त्यांच्या कार्याची सर्वांचे लक्ष या सर्वांचे वेधून घेतले होते. या सर्वांच्या सत्काराचा कार्यक्रम 24 जून रोजी वणीच्या बाजोरिया हॉल येथे संपन्न झाला.

या प्रसंगी मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रेल्वे प्रबंधक एस.पी. सिंग, संजय पिंपलशेंडे, चंद्रकुमार चोरडिया, अशोक भंडारी, विजय चोरडिया, राजा पाथ्रटकर, सुरेश खिवंसरा उपस्थित होते. कायक्रमाचे सूत्रसंचालन आनंद झामाड तर उपस्थितांचे आभार शुभम छाजेड यांनी मानले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

Comments are closed.