वणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

अचानक आलेल्या पावसाने वाटसरूंची उडाली तारांबळ

0

विलास ताजने, वणी: वणी शहरासह परिसरात (दि.२०) बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. साधारणतः अर्धा ते पाऊण तास हा पाऊस पडला. यामुळे शेवटच्या टप्यातील गहू, हरभरा पिकांना काही प्रमाणात फटका बसला. जनावरांचे वैरण झाकटोप करतांना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. बाजारात खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या वणीकरांचीही धावपळ झाली.

हवामान खात्याने विदर्भातील भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी सावध होते. दिवसभर आकाश अंशतः ढगाळलेले होते. तापमानात चढ उतार होत वणीचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस एवढे होते. कामे आटोपून घराकडे परतणाऱ्या वाटसरूंची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस थांबल्यावर घरांच्या अंगणात, रस्त्यावर बोरा समान गारांचा सडा पडलेला दिसत होता. पावसामुळे वातावरणात हवेचा गारवा निर्माण झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.