वणीत मंगळवारी घुमणार राज ठाकरे यांचा आवाज…

शासकीय मैदानावर संध्या. 6 वाजता राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ सभा

निकेश जिलठे, वणी: फॉर्म भरण्यात पहिला क्रमांकावर असणारे मनसेचे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर हे आता प्रचार सभेतही प्रथम ठरत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या अगोदर राज ठाकरे यांनी तोफ वणीत धडाडणार आहे. मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी संध्या. 6 वाजता शासकीय मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेचे फाल्गुन गोहोकार यांनी केले आहे.

काय बोलणार राज ठाकरे?
या निवडणुकीत मनसे हा पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे. वणी विधानसभेत रोजगार, प्रदूषण, विकासकामे, शेतकरी आत्महत्या इत्यादी स्थानिक मुद्दे आहेत. तर महागाई, शेतमालाचा भाव, गुजरातला जाणारे उद्योगधंदे, पक्ष फोडाफोडी इत्यादी राज्यपातळीवरील मुद्दे या निवडणुकीत आहेत. मात्र सर्वांचे लक्ष लाडकी बहिणीवर राहणार आहे. ‘लाडकी बहिण’ हा मास्टरस्ट्रोक ठरणार, असा दावा भाजप व महायुतीकडून केला जात आहे. राज ठाकरे त्यांच्या सभेत लाडक्या बहिणीवर काय टोला लावणार, यासह इतर मुद्यांचा ते कसा समाचार घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गेल्या वर्षीपासूनच मनसेचे उमेदवार राजू उंबरकर हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. राज ठाकरे यांनी स्वत: वणीला येऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हापासून राजू उंबरकर यांनी मतदारसंघात निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली होती. वणी शहरात विविध आंदोलनातून त्यांनी त्यांची एक लढाऊ नेता अशी सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे वणीत त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे. 

Comments are closed.