बहुगुणी डेस्क, वणी: परिसरातील एकमेव हिंदी माध्यमाची शाळा असलेल्या राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. वर्ग 5 ते 10 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी कोणतीही फीस नाही. मात्र केवळ मोजक्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याध्यापक अभय पारखी (MSc, MA, Mphil) (मो. 9765864980) यांनी केले आहे. पालकांना स. 8 ते दु. 12 या कार्यालयीन वेळेत राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, एमआयडीसी वणी (लालगुडा) येथे संपर्क साधून प्रवेश निश्चित करता येणार आहे.
शाळेची वैशिष्ट्ये –
* शाळेत विनामुल्य प्रवेश, अद्यावत प्रयोग शाळा व संगणक कक्ष
* निसर्गरम्य ठिकाणी सुसज्ज इमारत, विस्तिर्ण मैदान, उत्तम बैठक व्यवस्था
* सीसीटीव्ही यंत्रणा तसेच 24 तास सुरक्षा रक्षक तैनात
* शासनाच्या स्कॉलरशीपसह विविध योजना लागू
* स्नेहसंमेलन, विविध क्रीडा स्पर्धां, चर्चासत्रांचे आयोजन
* प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी
* शाळेत इंग्रजी, मराठी विषयाचा समावेश
* उच्चशिक्षित शिक्षक, उज्ज्वल यशाची परंपरा
परिसरात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. त्यामुळे विविध खाणी आपल्या भागात आहे. यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील लोक काम करतात. अनेकांचे शिक्षण हे हिंदी माध्यमातून झालेले असते. किंवा अनेकांची मातृभाषा ही हिंदी असते. असे म्हणतात की मातृभाषेत घेतलेले शिक्षण हे अधिक प्रभावी असते. त्यामुळे अशा हिंदी भाषीक विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय हा एकमेव हिंदी भाषेतून शिक्षण घेण्यासाठी पर्याय आहे. राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय हे छ. शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित शाळा आहे. आहे. गेल्या 25 वर्षांपासून संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा यांच्या मार्गदर्शनात शाळेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क –
राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय
एमआयडीसी, वणी (लालगुडा)
वेळ – स. 8 ते दुपारी 12 वाजे पर्यंत
Comments are closed.