शुभमंगल सावधान…. ! मंगल कार्यालयासमोरून दुचाकी चोरी

महिलांच्या पर्सचोरी नंतर आता दुचाकी चोरटे फॉर्मात

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात सातत्याने चोरीच्या घटना होत आहे. लग्न समारंभ तर चोरट्यांसाठी आनंदाची पर्वणीच ठरला आहे. लग्न समारंभात आलेल्या महिलांच्या पर्स चोरीचे प्रमाण सध्या चांगलेच वाढले आहे. अशातच आता मंगल कार्यालयासमोर ठेवलेली एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यदी प्रतिक बंडू ठावरी (22) हा कृष्णानपूर ता. वणी येथील रहिवासी आहे. तो शेतीचे काम करतो. दिनांक 20 मे रोजी तो दुपारी होन्डा शाईन (MH-29 BQ9040) या लाल व काळ्या रंगाच्या बाईकने वणी येथे लग्नासाठी आला होता. दु. 1 वाजताच्या दरम्यान त्याने दुचाकी तिरुपती मंगल कार्यालयाच्या समोर लावली. त्यानंतर तो लग्न समारंभासाठी हॉलमध्ये गेला. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास तो गावी परत जाण्यासाठी निघाला.

त्याने ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी पाहिली असता त्याला तिथे दुचाकी आढळली नाही. त्याने आजूबाजूला शोध घेतला मात्र त्याला दुचाकीची माहिती मिळाली नाही. त्याने एक आठवडा दुचाकीचा शोध घेतला. अखेर दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्याने वणी पोलीस स्टेशन गाठले व याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.  

Comments are closed.