विलास ताजने, वणी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील राजेश सुधाकरराव आसुटकर (वय 55) यांचे दि. 25 जून मंगळवारला रात्री रेल्वे प्रवासादरम्यान बडनेरा जवळ अकस्मात निधन झाले. ते पुणे येथे वास्तव्यास होते. प्राप्त माहितीनुसार शेतीविषयक कामानिमित्त ते मुकुटबन येथे दोन दिवसांपूर्वी आले होते. मंगळवारला सायंकाळी वरोरा वरून रेल्वेने पुणे येथे जाण्यास निघाले. रात्री साडे नऊ वाजता बडनेरा जवळ प्रवासात त्यांची प्रकृती ढासळून त्यांचे निधन झाले. रेल्वे पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना माहिती दिली. रात्री उशिरा नातेवाईक अमरावतीला पोहोचले. उत्तरीय तपासणी अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारला सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान मुकुटबन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी वंदना, दोन मुली, मुलगा, जावई आणि बराचसा आप्त परिवार आहे. ते नवनिर्माण बायोटेकचे संचालक होते. दोन अडीच दशकांपूर्वी डॉ. मुंजे यांच्या दवाखान्या जवळ त्यांचे ‘राजा मेडिकल्स’ होते. शेतीक्षेत्रातही वेगवेगळे प्रयोग ते करत असत. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहेत.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.