राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त वणीत छत्री वाटप उपक्रम

शहर काँग्रेस व सेवादलातर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्त वणीत छत्री वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. वसंत जिनिंगचे अध्यक्ष व काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष खुळसंगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, ऍड देविदास काळे, राजू येल्टीवार, घनश्याम पावडे, ओम ठाकूर, संध्या बोबडे, विवेक मांडवकर इत्यादींची उपस्थिती होती.

Podar School 2025

शहरात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात. कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने भाजी, फळ, कपडा विक्रेते यासह फूटपाथवर बसून उदरनिर्वाह करणा-या विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आली. यामुळे या छोट्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळाला आहे. विक्रेत्यांनी आशिष खुळसंगे यांचे आभार मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजीव गांधी यांना अभिवादन
वणी शहर काँग्रेस व सेवादल काँग्रेस तर्फे स्व. राजीव गांधी यांच्या 80 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील राजीव गांधी चौक येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष महेंद्र लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या अभिवादन कार्यक्रमाला घनश्याम पावडे तालुकाध्यक्ष, संध्या बोबडे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष, प्रमोद लोणारे सेवादल शहराध्यक्ष, राजाभाऊ पाथ्रडकर, विकेष पानघाटे, सुरेश बनसोड, रवी कोटावार, अशोक नागभिडकर, अरविंद बोबडे, भय्याजी बदखल, सविता रासेकर, गंगासिंग चव्हाण, महेश गिरुळकर, गजानन ढोले, राजू पेंढारकर, दिनेश पाउनकर, रमाकांत वानखेडे, राकेश कनोजे, बबलू चौहान, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.