सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा लोकांचा हक्काचा कार्यकर्ता…

राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी, उद्योजक, पत्रकार अशी विविधांगी ओळख असलेले राजू तुराणकर यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस…. एखादी व्यक्ती राजकारणात असली की लोकांच्या मनात आपसुकच शंका येते. सर्वसामान्यांच्या संपर्काच्या नेहमी दूर असणारे नेते निवडणूक जवळ आली की अचानक चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात. लोकांच्या भेटी गाठी घेणे, लोकांशी उगीच लगट लावणे, काही स्वार्थ असेल तरच एखाद्याचे काम करणे असे विविध प्रकार निडणूक जवळ आल्यावर किंवा एखाद्या राजकारण्याबाबत पाहायला मिळतात. मात्र या सर्वांना अपवाद ठरतात ते राजू तुराणकर. म्हणजेच सर्वसामान्यांचे राजू भाऊ…

माणूस आपल्या परिसरातला असो किंवा शहरातील कोणत्याही भागातला. इतकेच काय तर ग्रामीण भागातला असला किंवा कोणत्याही जाती धर्माचा, समाजाचा असो त्यांचे काम तडीस नेणारे राजूभाऊ सर्वांसाठी हक्काचे आहे. नेहमी जमिनीवर पाय आणि तोंडात साखर ठेवून त्यांच्या कामाला प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राजू भाऊ कायम तत्परता दाखवतात. कदाचित राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा पिंड असल्याने हे असावं.

परिसरातील लहान व्यक्ती असो किंवा मोठी त्यांच्या कायम ते संपर्कात राहतात. आम्ही लहान असताना राजू भाऊ यांची नेहमी वार्डात चक्कर असायची. लोकांना आपुलकीने ते विचारपूस करायचे. त्यातूनच 25-30 वर्षांआधी त्यांच्याशी परिचय झाला. कुठल्याही समस्या असो ते सोडवण्याचा कायम प्रयत्न करायचे. त्यांच्या या कामाची पावती देखील त्यांना मिळाली व लोकांनी भरगोस मतदान करून नगरसेवक म्हणून निवडूनही दिले. त्या काळात एक प्रभावी लोकप्रतिनिधी व आक्रमक विरोधी म्हणून त्यांनी काम केले. या पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळातील त्यांचे अनेक किस्से आहेत. मात्र ते पुन्हा कधी.

आज जरी राजूभाऊ लोकप्रतिनिधी नसले, तरी एखाद्या लोकप्रतिनिधींपेक्षाही अधिक संपर्क त्यांचा मतदारांशी आहे, असे म्हणण्यास अधिक वाव आहे. राजकारणी जरी असले तरी कुठे राजकारण करावं याची त्यांना चांगली जाण त्यांना आहे. अनेक घटनांमधून हे वेळोवेळी समोर आलं आहे. मात्र हे सर्व करताना आपला व्यवसायाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही. परिश्रम, जिद्द, जोखीम याच्या बळावर त्यांच्या व्यवसायाचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे.

लोकांशी असलेला त्यांचा जनसंपर्क याचा फायदा त्यांना एक पत्रकार म्हणून कायमच झालेला आहे. लोकांच्या समस्या असो किंवा एखाद्याच्या न्याय हक्काची लढाई असो. कधी आर्जव करून तर प्रसंगी कठोर भूमिका घेण्याची तयारी त्यांची असते. सोबतच याला पत्रकारितेतूनही वाचा फोडण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. यामुळे लोकांचे प्रश्न सुटण्यास आणखी बळ मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून मी राजू भाऊ यांचे कार्य बघत आहो. अनेकदा त्यांच्या भूमिकेशी सहमती नसायची. मात्र त्याचा कुठलाही राग, मत्सर त्यांनी कधी ठेवला नाही.

राजू भाऊ यांचे कार्य सुरू असताना त्यांच्या वाटेत अनेक खाचखडगे आले. वाटेला अपमान आला. कधी तो पचवून तर कधी त्याकडे दुर्लक्ष करून ‘तु चाल गड्या तुला पर्वा कुणाची’ हे तत्व बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे. पद, पक्ष असो किंवा नसो राजू भाऊ 25 वर्षांपूर्वी जसे होते तसेच आजही आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा, लोकांचा हक्काच्या या कार्यकर्त्याला फक्त राजकारणच नाही तर समाजकारण, व्यवसाय, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा… – निकेश जिलठे

(राजू तुराणकर – 9422673123)

Comments are closed.