सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार यांचा सपत्नीक सत्कार

जागतिक महिला दिनी शहरातील नामवंत महिलांनी केले कामाचे कौतुक

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्राच्या माध्यमातून महिलांशी निगडित प्रश्नांना न्याय मिळवून देण्याची धडपड करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार यांचे सत्कार करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी विविध क्षेत्रातील नामवंत महिलांनी राजू तुराणकर यांचे घरी जाऊन शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक त्यांच्या कार्याचा गौरव केला.

वसतिगृहात शिकणाऱ्या मुलींना वैद्यकीय व शैक्षणिक मदत, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिलांना मदत व त्यांच्या समस्या सातत्याने रेटून पाठपुरावा करणे व कॉलेज मधील मुलींना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून एका प्राध्यापकाला धडा शिकवने या सारख्या अनेक गोष्टीतून महिलांना सन्मान मिळवून देण्याची धडपड शिवसेना शहर प्रमुख व सामाजिक कार्यकर्ता राजू तुराणकार करीत आहे.

राजू तुराणकार यांच्या कृतत्वाचे सन्मान करताना महिला बाल कल्याण प्रकल्प अधिकारी पौर्णिमा शीरभाते, माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, मंदा बांगरे, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले, वंदना धगडी, जोत्सना आचार्य, सुरेखा वाडीचार, पत्रकार परशुराम पोटे, गीता तुराणकर, साधना तुराणकर, ज्योती तुराणकर व रागिणी तुराणकर उपस्थित होत्या.

Comments are closed.