विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) समाज महासंघाच्या कार्यकारिणीत

0

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर प्रमुख राजू तुराणकर यांची ओळख आहे.

या नियुक्तीबाबत त्यांना एका पत्राद्वारे काळविण्यात आले. धोबी समाजाच्या प्रश्नासाठी शासन व व्यवस्थेविरुद्ध ते सातत्याने लढत आहेत. एका जबाबदारीच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी उभारलेल्या कोणत्याही लढ्यासाठी लाखों समाजबांधव त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा कार्यकर्यांचा विश्वास आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय हक्क लोकांना मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहतील असे तुराणकर म्हणालेत. त्यांची नियुक्ती धोबी समाजाचे संस्थापक अध्यक्ष डी.डी सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, मुख्य महासचिव जयराम वाघ, कोषाध्यक्ष संजय कानोरिया यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.