ग्रामीण भागात राजू उंबरकर यांचा जलवा, कार्यकर्ते लागले कामाला

कॉर्नर मिटिंगला शेकडोंची गर्दी, म्हणतात यंदा वारं फिरलंय...!

निकेश जिलठे, वणी: यंदा राजू उंबरकर यांनी आपला जोर ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्याला सर्वसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा, महिला इत्यादींची मोठी गर्दी त्यांच्या कॉर्नर मिटिंगला होत आहे. सभेत ते त्यांच्याजवळ आपल्या समस्या बोलून दाखवत आहे. कॉर्नर मिटिंगला होणारी शेकडो लोकांची गर्दीमुळे मतदार त्यांच्याकडे एक प्रभावी व सक्षम पर्याय म्हणून पाहत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यंदाची लढत ही चांगलीच रंगतदार होणार आहेत.

वणी विधानसभा क्षेत्रात सर्वप्रथम राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर झाली. राज ठाकरे यांनी स्वत: वणीत येऊन हे जाहीर केले. तर अधिकृतरित्या देखील सर्व पक्षामध्ये त्यांचीच उमेदवारी सर्वात आधी जाहीर झाली. उमेदवारी अर्ज भरण्यातही त्यांच्याच पहिला क्रमांक होता. आधी अर्ज भरल्याने सर्वात आधी ते व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अद्याप अधिकृत प्रचार सुरु व्हायचा असल्याने राजू उंबरकर यांनी गावभेटीवर आपला जोर दिला आहे. गावात जाऊन सध्या ते कॉर्नर मिटिंग घेत आहे. लोकांच्या समस्या समजून घेत आहे. त्याच्या या दौ-याला ग्रामीण भागातील मतदारांचाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

कार्यकर्ते उतरले मैदानात
वणी, मारेगाव व झरी तालुक्यात मिटिंगचा हा झंजावात सुरु आहे. काही ठिकाणी स्वत: राजू उंबरकर तर काही ठिकाणी कार्यकर्ते हे गावभेट घेत मिटिंग घेत आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ते मैदानात उतरल्याने त्याचा राजू उंबरकर यांना चांगलाच फायदा होत आहे. ग्रामीण भागातील बसची समस्या, पांदण रस्ते, शिक्षण, पाणी, रोजगार इत्यादी समस्यांचा राजू उंबरकर संपूर्ण पंचवार्षिक पाठपुरावा करीत होते. यातील अनेक समस्या सोडवण्यात त्यांना यशही आले. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून मनसेचे गावखेड्यातील कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे मैदानात उतरले असून ते सध्या त्यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.

यंदा वारं फिरणार – राजू उंबरकर
सध्या ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या अडीअडचणी, प्रश्न, शासन दरबारी असलेल्या प्रलंबित समस्या यांची माहिती घेत आहो. काहींच्या समस्या वर्षांनुवर्षांपासून सुटल्या नाहीत. लोकांना या समस्या केवळ मीच सोडवू शकतो असा विश्वास आहे. त्यामुळेच गावभेट दौऱ्याला जनतेमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वणी, मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यातून मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून यंदा वारं फिरणार आहे, अशी प्रतिक्रिया राजू उंबरकर यांनी वणी बहुगुणीला दिली.

राजू उंबरकर यांचा ग्रामीण भागातील प्रभाव वाढलेला आहे. गेल्या वेळी झरी तालुक्यात त्यांची निराशा झाली होती. मात्र गेल्या 5 वर्षांत त्यांनी ही कमी दूर केली. झरी तालुक्यात कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्यात ते यशस्वी झाले आहे. यासह वणी ग्रामीण मध्येही त्यांनी चांगलेच परिश्रम घेतले आहे. याचा आगामी निवडणुकीत किती फायदा होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

Comments are closed.