निकेश जिलठे, वणी: सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठे कॉर्नर सभा, कुठे पदयात्रा तर कुठे कॉर्नर सभा रंगत असताना मनसेचे प्रचारासाठी असलेली पथनाट्याची टीम सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. शहरातील विविध समस्या, शेतकरी यांच्या समस्या, सर्वसामान्यांचे प्रश्न, महागाई इत्यादीवर तसेच राजू उंबरकर यांच्या आयुष्यातील विविध क्षण या पथनाट्यातून सादर केले जात आहे. प्रचाराला सुरुवात होताच पथनाट्याची चमू विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून मतदारांचे लक्ष वेधत आहे.
जतिन राऊत, वैभव पुराणकर, नचिकेत गायकवाड. शीतल पिंपळशेंडे, स्वरा उइके, हर्षल ईखारे, योगेश तुराणकर, प्रदीप गुप्ता इत्यादी युवा कलावंत पथनाट्य सादर करीत आहे. गाणे आणि अभिनयाच्या माध्यमातून ही चमू विविध विषयावरील पथनाट्य सादर करीत आहे. यात शेतकरी आत्महत्या, महागाई, बि-बियाणे, स्थानिकांचा रोजगार इत्यादी विषयांचा समावेश आहे. या पथनाट्याला मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोबतच राजू उंबरकर यांच्या राजकीय व सामाजिक जीवनातील विशेष प्रसंग देखील या पथनाट्यातून सादर केले जात आहे.
उंबरकर यांच्या तुरुंगवासाचे चित्रण
2017 मध्ये वणी विधानसभा क्षेत्रात पिकांना फवारणी करताना 19 शेतक-यांचा मृत्यू झाला होता. याविरोधात राजू उंबरकर यांनी यवतमाळ येथील कृषी अधिकारी कार्यालयात राडा केला होता. यावेळी त्यांना 17 दिवसाचा तुरुंगवास झाला होता. या थरारक दिवसाचा अनुभव पथनाट्याद्वारे सादर केला जात आहे. यावेळी मतदार चांगलेच भावूक होत आहे.
राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांचा जोश आणखी वाढला आहे. खेड्यापाड्यातील तरुणाई राजू उंबरकर यांचा प्रचारार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. वणी शहरात विविध आंदोलनातून त्यांनी त्यांची एक लढाऊ नेता अशी सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे वणीत त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे. मात्र गेल्या काही वर्षांतील सर्वसमावेशक कामांमुळे आता सर्व वयोगटात व ग्रामीण भागातही त्यांची प्रतिमा ‘कामाचा माणूस’ म्हणून झाली आहे.
Comments are closed.