लोकप्रतिनिधींना केवळ नफ्याच्या कामात इटरेस्ट – राजू उंबरकर

शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर मनसे आक्रमक

बहुगुणी डेस्क, वणी: मृग नक्षत्र लागूनही अद्याप तालुक्यात जोरदार पाऊस तालुक्यात झाला नाही. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. अनेक शेतक-यांकडे ओलिताची व्यवस्था आहे. मात्र त्यासाठी लागणारा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. शेतकर्‍यांना रासायनिक खते आणि बी बियाणे मिळवण्यासाठी मोठी अडचण होत आहे. खते बी-बियाणे रासायनिक खते मिळवण्यासाठी कृषी केंद्र संचालक विद्राव्य खते किंवा इतर खते घेतल्याशिवाय रासायनिक खते बी बियाणे देत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ नगदी नफ्याच्या कामात स्वारस्य दाखवतात आणि शेतकऱ्याच्या प्रश्नांकड दुर्लक्ष करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे ? असा प्रश्न मनसे नेते राजू उंबरकर यांनी उपस्थित करीत स्थानिक लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. ते मारेगाव येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर सरकार, स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदारांना धारेवर धरले.

पावसाळा तोंडावर असताना महावितरण कडून देखभाल दुरुस्तीची कामे अद्याप सुरू करण्यात आले आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेच्या दैनदिन जीवनावर आणि व्यवहारावर होत आहे. ग्रामीण भागात तासंतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पीठ गिरण्या व अन्य कामे ठप्प पडून याचा त्रास गावकऱ्याना होत आहे. लोकप्रतिनिधिनी लक्ष देऊन तालुक्यात २२० के.व्ही. उपकेंद्राची उभारणी करावी. अशी मागणी यावेळी उंबरकर यांनी केली.

शेतमाल बाजारात पोहोचविण्याकरीता तसेच यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची गरज आहे, जिल्ह्यातील सर्व मतदार संघात या पांदन रस्त्याची कामे पूर्णत्वास गेलेली आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधीच्या उदासीनतेने मतदार संघात कुठेही पांदन रस्ते झालेले नाही. अनेक ठिकाणी पांदन रस्त्याचा वाद शासन दरबारी अडकून आहे. याकडे प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ नगदी नफ्याच्या कामात स्वारस्य दाखवतात आणि शेतकऱ्याच्या जिव्हाळाच्या विषयाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शेतकऱ्याला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. असाही आरोप त्यांनी केला.

कृषी केंद्र चालकांची मनमानी
शेतकर्‍यांना रासायनिक खते आणि बी बियाणे मिळवण्यासाठी मोठी अडचण होत आहे. खते बी-बियाणे रासायनिक खते मिळवण्यासाठी कृषी केंद्र संचालक विद्राव्य खते किंवा इतर खते घेतल्याशिवाय रासायनिक खते बी बियाणे देत नाही. तर बियाण्यांच्या बाबतींत लिंकिंग करीत आहे. काही कृषी केंद्र संचालक बोगस बियाण्यांची देखील विक्री करीत आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा प्रकर मनसे खपवून घेणार नाही, असा इशारा राजू उंबरकर यांनी दिला.

पत्रकार परिषदेला मनले जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, रुपेश ढोके, धनंजय त्रंबके, उज्ज्वला चंदनखेडे, नवी शेख, उदय खिरटकर, किशोर मानकर, जम्मून खान यांच्यासह स्थानिक मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व तालु्क्यातील शेतकरी उपस्थित होते.


https://youtu.be/f-lJHfJaCnU

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.