राजू उंबरकर वणी पोलिसांच्या नजरकैदेत..!

उंबरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा... मनसे कार्यकर्त्यांवरही वणी पोलिसांचा 'वॉच'

जितेंद्र कोठारी, वणी: औरंगाबाद येथे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राज ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन राज्य भरात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना धरपकड करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचा चांगला जनाधार आहे. त्यामुळे वणी पोलीसांनी खास खबरदारी घेत मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या घराबाहेर मंगळवारी रात्री पासून पोलिसांचा पहारा लावला आहे. उंबरकर याना घराबाहेर जाण्यास मनाही करण्यात आली आहे.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, माजी नगरसेवक धनंजय त्रिंबके, अर्चना बोधाडकरसह मनसेच्या 7 कार्यकर्त्यांना वणी पोलिसांनी मंगळवारी रात्री कलम 149 ची नोटीस बजावली आहे. बजावलेल्या नोटिशीमध्ये त्यांनी जमाव जमवू नये, इतर धर्मियांची भावना दुखावेल असे कोणतेही कृत्य करू नये, आपण किंवा आपल्या कार्यकर्त्याकडून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. वणी पोलीस मनसे कार्यकर्त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे.

Podar School

सरकारला परिणाम भोगावे लागेल

हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न जरी सरकारने केला तर लाखो मनसैनिक रस्त्यावर उतरण्यास सज्ज आहे. सरकार मला किती दिवस बंदिस्त ठेवणार आहे ? हिंदूधर्म विरोधी या सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागेल.
राजू उंबरकर- प्रदेश उपाध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Sunrise
Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!