पत्नी व तिच्या मोठ्या बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण

पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती विरुद्द गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: क्षुल्लक कारणावरून पत्नी व पत्नीची मोठी बहिणीला हॉकी स्टिकने मारहाण करणाऱ्या पती विरुद्द वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कृष्णाजी गेडाम रा. विठ्ठलवाडी वणी असे आरोपी पतीचे नाव आहे.

फिर्यादी नमिता सुनील गेडाम(40) रा. विठ्ठलवाडी हिने दिलेल्या तक्रारीनुसार एंजल मेकअप स्टुडिओ नावाने तिचा ब्युटीपार्लर व्यवसाय आहे. दि. 1 मे रोजी सायंकाळी घरातील कचरा काढण्याचा वादावरून तिचे पती सुनील गेडाम यांनी दारु पिऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण केली. मारहाणीमुळे घाबरुन फिर्यादी नमिता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन घराबाहेर निघाली व अनिस हॉल लॉजमध्ये रात्र मुक्काम केला.

सोमवार 2 मे रोजी नमिताने तिच्या मोठ्या बहीणीला बोलावून तिच्यासोबत आपल्या घरी गेली. त्या दिवशी पती सुनील गेडाम तिला काहीच बोलला नाही. मंगळवार 3 मे रोजी सकाळी सुनील यांनी पत्नी नमिताला बहिणीला घरी का आणले? असे म्हणून तिला शिवीगाळ व मारहाण केली. लहान बहिनला मारहाण होत असताना नमिताची मोठी बहीण प्रीती मंगल पाटील ही सोडवण्यासाठी मधात आली. त्यामुळे चिडून आरोपीने तिचा लिनोवो कंपनीचा टॅब फोडून दिला तसेच तिच्यावर हॉकी स्टिकने हल्ला केला. या मारहाणीत प्रीती पाटील हीचा डावा हात फ्रॅक्चर झाला.

मारहाणीच्या घटनेनंतर फिर्यादी नमिता गेडाम हिने तिच्या बहिणीला घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि पती सुनील गेडाम (48) विरुद्द तक्रार नोंदवली. पीडितांची वैधकीय चाचणी करून पोलिसांनी आरोपी विरुद्द कलम 326, 323, 504, 427 भादवी अनव्ये गुन्हा दाखल केले आहे.

Comments are closed.