राजूरमध्ये बंदला हिंसक वळण

संतप्त आंदोलकांनी जाळले टायर

0

निकेश जिलठे, वणी: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरात बंद पुकारण्यात आला आहे. राजूरमध्येही या बंदचे पडसाद पडले. राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदने हिंसक वळण घेतले. राजूरमध्ये संतप्त आंदोलकांनी टायर जाळत आपला संताप व्यक्त केला.

सकाळी 11 च्या सुमारास आंदोलकांनी दीक्षाभूमी बुद्धविहारातून मोर्चा काढला. हा मोर्चा संपूर्ण गावात फिरला. या मोर्चात सुमारे हजार लोक सहभागी झाले होते. मोर्चाने बंदचे आवाहन करताच शाळा, व्यापारी प्रतिष्ठाण बंद करण्यात आले. सोबतच सकाळपासून सुरू असलेली ऑटो सेवा ही बंद करण्यात आली.

संपूर्ण गाव फिरल्यानंतर शेवटी मोर्चा राजूर फाट्यावर गेला. तिथे आंदोलक संतप्त झाले. तिथे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत टायर जाळले. काही वेळातच तिथे पोलीस पोहोचताच आंदोलक शांत झाले आणि आंदोलक तिथून निघून गेले. सध्या राजूरमध्ये परिस्थिती शांत असून कोणताही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती आहे. अद्याप ऑटोसेवा सुरू झालेली नाही.

या मोर्चात बसपा, युवा भीमशक्ती. बहुजन स्टुडंट फेडरेशन, आरपीआय, कम्युनिस्ट संघटनेसोबतच विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.