विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर गावात कचऱ्याचे ढिगारे मोठया प्रमाणात दिसून येत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता व घरगुती कचऱ्याचे नियोजन करण्याकरिता गावात 50 कचराकुंडी व घंटागाडीची व्यवस्था करावी. अशाप्रकारचे निवेदन गावातील अजय कंडेवार व आशा रामटेके यांनी ग्रामपंचायतीला दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व वेगवेगळ्या आजारांपासून मुक्त राहण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु राजूर ग्रामपंचायत याबाबत उदासीन दिसून येत आहे. कॉलरीचा चेहरा गेल्या काही दिवसांपासून विद्रूप होत चाललेला आहे. मागील दहा दिवसांपासून तब्बल एक टन कचरा कुंडीच्या बाहेर रस्त्यावर साचून असलेला दिसून येत आहे.
बाजार वाडीपासून कचरा कुंडी तुटून फुटून दिसून येत आहे. या गावाची अवस्था दयनीय होत आहे. ग्रामवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी घंटागाडीची व्यवस्था करुन द्यावी. कचरा व्यवस्थापनासाठी कचराकुंडीची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
गावात लहानसहान कचराकुंडीचीसुद्धा व्यवस्था नाही. गावाची लोकसंख्या बघता येथे मोठ्या कचराकुंड्यांची गरज आहे. कचरा कुंडीची साईज जेमतेम 12 ×10 फूट असली पाहिजे. त्याच बरोबर कायमस्वरूपी घंटागाडीची सोय उपलब्ध करुन त्यांना आरोग्याकड़े लक्ष द्यावे. अशाप्रकारचे निवेदन राजूर ग्रामपंचायतीला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिति जिल्हाध्यक्ष अजय कंडेवार व गावातील समाजसेविका आशा रामटेके यांनी निवेदन दिले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)