घरकुल लाभार्थ्यांसाठी सरपंचाचा पुढाकार
ग्रामसेवक नसतानाही ग्रामसभा घेत लाभार्थ्यांना केलं मार्गदर्शन
रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील घरकुल लाभार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी येथील महिला सरपंचांनी पुढाकार घेत ग्रामसभा आयोजित करून लाभार्थ्यांना मार्गदर्शेन केले. राजूर कॉलरी येथील विकासाला नवी दिशा मिळावी यासाठी महिला सरपंच प्रणिता मो. असलम पाठपुरावा करून अनेक योजना राबविताना दिसत आहे.
वेळीच पाठपुरावा करून ग्रामस्थांना योजनांची माहिती देणे. गावात सुरू असलेल्या कामावर लक्ष ठेऊन पाठपुरावा करणे आदी बाबी लक्षात घेऊन त्या वाटचाल करीत आहेत. गावात घरकुल लाभार्थी संभ्रमात होते. उलट सुलट चर्चेला उधाण आले असताना सरपंच प्रणिता मो असलम यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीची ग्रामसभा आयोजित केली. प्रसंगी ग्रामसेवकाला दुसऱ्या गावात काम असल्याने ते उपस्थित झाले नाही.
अशा बिकट परिस्थितीत प्रणिता यांनी लिपिक जगदीश यांना सोबत घेऊन घरकुल लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दरम्यान लाभार्थ्यांमध्ये प्रचंड रोष होता. पण परिस्थितीत सांभाळत त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन करून ग्रामस्थांना योजनेची माहिती देत आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.