राजूर येथे खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार:

गावकऱ्यांनी मांडल्या खासदारांपुढे समस्या

0

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा राजूर येथील मेथोडिस्ट चर्च येथे सत्कार घेण्यात आला. खासदार झाल्यानंतर त्यांची राजूर या गावाला पहिलीच भेट. त्यांनी गावातील लोकांशी भेट घालून त्याच्या समस्या एकूण त्यावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले.

Podar School 2025

राजूर येथील फ्री मेथोडीस्ट चर्चच्या प्रांगणात खासदारांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच राजूर या गावाला भेट. कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार ,प्रमुख पाहुणे नंदू बरडिया, ओम ठाकुर,

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आशीष कुडसंगे ,गिरीश पास्टर , दुर्लावार पास्टर उपस्थिती होते. यावेळी राजूर येथील गावकऱ्यांनी गावात असलेल्या रस्ते, नाली, घरकुल, स्मशानभूमी या समस्या सांगितल्या. खासदारांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन प्रकाश तालावार तर उपस्थितांचे आभार प्रा.अजय कंडेवार यांनी मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन फ्री मेथोडिस्ट चर्च राजुर कमिटीद्वारा करण्यात आले होते. कमेटीचे सदस्य डेविड पेरकावार, प्रकाश तालावार,अब्राहम कलवलवार, श्याम संगमवार, अजय कंडेवार, आशीष, अभिषेक, शमूएल, गिरीश श्रीमनवार हे यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.